
चिपळूणमध्ये रविवारी ढगफुटीसदृश पाऊस
ज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होताना दिसत आहे. काही तास पावसाच्या सरी बरसल्याने उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळत आहे.चिपळूणमध्ये रविवारी ढगफुटीसदृश पाऊस झाला. चिपळूणमधील सह्याद्री भागात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाचे व्हिडिओ समोर येत आहेत. अर्धा तास मुसळधार पडलेल्या पावसाने अडरे, अनारी परिसरातल्या नद्या प्रवाहित झाल्या. मे महिन्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना या भागातील नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. सह्याद्री भागातील गावांमध्ये पडलेला मुसळधार पाउस चर्चेचा विषय बनला आहे. मुसळधार पावसामुळे नद्या प्रवाहित झाल्यामुळे गावातील पुलाचे काम करण्यासाठी आणलेले साहित्य देखील या पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेले.www.konkantoday.com




