चाकण-शिक्रापूर रस्त्यावर गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा स्फोट, स्फोटामुळे एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील चाकण शिक्रापूर रोडवर गॅस टँकरमध्ये झालेल्या भीषण स्फोटाने १ किमीचा परिसर हादरला आणि घरांची पडझड झाली. मोहितेवाडी (ता. खेड) चाकण-शिक्रापूर रस्त्यावर गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला आणि अनेक घरांची पडझड झाली. रविवारी पहाटे मोहितेवाडी परिसरात ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. मात्र, घराची पडझड होऊन मोठे नुकसान झाले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. टँकरचा स्फोट झाल्याने परिसरात उभ्या असलेल्या इतर वाहनांनी पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांसह घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. टँकरमधून गॅस गळती झाल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील मोहितेवाडी परिसरात खाद्यपदार्थांचा ढाबा आहे. या ढाब्यावर नेहमीच रहदारी असते. रविवारी पहाटे या ढाब्यासमोर गॅस टँकर उभा होता. अचानक या टँकरने पेट घेतला. काही वेळातच गॅस टँकरचा स्फोट झाला. या स्फोटाचे धक्के एक किलोमीटर दूरपर्यंत जाणवले. गॅसच्या स्फोटामुळे महामार्गावरील अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. काही घरांचीही पडझड झाली. मात्र, सुदैवाची बाब म्हणजे या घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button