
कोळथर येथे वादातून एकाची हत्या
दापोली तालुक्यातील कोळथरे येथील विशाल शशिकांत मयेकर वय वर्ष ३९ याची वादातून मारहाणीत हत्या झाल्याची घटना शनिवार दिनांक १८ मे रोजी सकाळी दहा वाजणाच्या पूर्वी कोळथर मोहल्ला येथे घडली. दाभोळ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत विशाल शशिकांत मयेकर आणि त्याचा मित्र शशिभुशण शांताराम सणकुळकर आणि मनोज प्रभाकर आरेकर यांच्यासह मोलमजूरी करायला नेहमी जात असे.आणि दारू पित असत.या नशेत होणाऱ्या वादातून अनेकदा धक्काबुक्की शशिभुशण शांताराम सणकुळकर धक्काबुक्कीकरित असे.दिनांक १८ मे रोजी अशाच प्रकारचा वाद आणि धक्काबुक्की झाली आणि त्यातच शशिभुशण याने वादातच कोणत्या तरी जड वस्तूने किंवा हत्याराने मयत विशाल मयेकर याच्यावर वार केला ,त्यातच पंचनदी निर्बुडेवाडी येथे रहाणा-या विशालचा मृत्यू झाला.