केबीबीएफ रत्नागिरी शाखेची बैठक
रत्नागिरी : कऱ्हाडे ब्राह्मण बेनेव्होलंट फाउंडेशन (केबीबीएफ) रत्नागिरीची मासिक सभा नुकतीच हॉटेल सी फॅन्स येथे पार पडली. या सभेला २४ सदस्य उपस्थित होते. नवीन वर्षात पहिल्याच महिन्यात सदस्य संख्या दहाने वाढली आहे, याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.प्रार्थनेनंतर सर्वांच्या सभेला सुरवात झाली. रत्नागिरी शाखेचे नूतन अध्यक्ष सुहास ठाकूरदेसाई यांनी रत्नागिरी शाखा आणि उपक्रमांसंदर्भात माहिती दिली. त्या नंतर सर्वांनी आपापली ओळख सांगितली. एक मिनीटात उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल आदित्य सरपोतदार यांना बक्षीस देण्यात आले. सौ. कांचन चांदोरकर यांनी एका मिनीटात ओळख कशी करून द्यावी, याची माहिती दिली. त्या नंतर योगेश मुळ्ये यांनी केबीबीएफ ग्लोबलसंदर्भात माहिती आणि नव्या वेबसाईटचे प्रेझेंटेशन केले. ठाणे येथे होणाऱ्या ग्लोबल मीटबद्दल माहिती दिली.खजिनदार गीता भागवत यांनी बिझिनेस ट्रॅकिंगसंदर्भात माहिती दिली. कऱ्हाडे ब्राह्मण बेनेव्होलंट फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास ठाकुरदेसाई, सचिव अभिजित करंबेळकर, खजिनदार गीता भागवत आणि कमिटी सदस्य अॅड. गौरव महाजनी यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली. दरमहा अशी बैठक आयोजित करण्यात येते. त्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात येते. कऱ्हाडे ब्राह्मण ज्ञातीतील उद्योजकांनी अधिक माहितीसाठी सुहास ठाकुरदेसाई (9822290859 )यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.