आगामी काळात पावसाळ्यातील किटकजन्य आजार रोखण्यासाठी आवाहन
आगामी काळात पावसाळ्यातील किटकजन्य आजारांपासून सावधगिरी बाळगण्याच्या सूचना रत्नागिरी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आल्या आहेत. हे आजार टाळण्यासाठी डास प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात असे आवाहन केले आहे. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सार्वजनिक उपाययोजना करण्याचे नियोजन केले आहे.किटकजन्य आजारांपासून संरक्षण व्हावे यासाठी शौचालयाच्या व्हॅट पाईपला व आउटलेटला जाळ्या बसवाव्यात, भंगार साहित्याची विल्हेवाट लावावी, डासांच्या नियंत्रणासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, डास उत्पत्ती स्थाने नष्ट करावीत, पाण्याची भांडी धुवून कोरडी करून वापरावीत. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळला जावा, असे आवाहन नागरिकांना आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. नगर परिषदेकडून स्वच्छतेसाठी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तुंबलेली गटारे स्वच्छ करण्यावर भर देण्यात आल्याचे सांगण्यात आले. www.konkantoday.com