
अनेक पतसंस्थाना चुना लावणाऱ्या कोल्हापुरातील सोनारासह चौघे पोलिसांच्या ताब्यात
राजापुरातील एका घरफोडीची चौकशी करताना नकली सोन्यावर कर्ज प्रकरण करून पतसंस्था, बँकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात आहे.सात संस्थांमध्ये साडेतीनशे तोळे नकली सोनं ठेवून सुमारे साडेतीन कोटी पन्नास लाखांचा कर्ज उचलल्याचं यामध्ये उघड झालंय. यामध्ये रत्नागिरीतील भंडारी खारवी समाज पतसंस्था, मलकापूर अर्बन बँक, खंडाळा अर्बन, राजापूर कुणबी पतसंस्था, बँक ऑफ इंडिया पावस शाखा, मिटगव्हाणे श्रमिक पतसंस्था या आस्थापनांना फसवलं असल्याचं तपासात पुढे आलं आहे.या प्रकरणी कोल्हापूरच्या सोनारासह त्याचे तीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये गुन्हे शाखेनं कोल्हापूर येथील सराफ अमोल पोद्दार याच्यासह त्याचे साथीदार योगेश सुर्वे (रा. तुळसुंदे), अमेय पाथरे (रा. पावस) व प्रभाकर नाविक या चौघा संशयताना ताब्यात घेतला आहे.राजापुरात काही दिवसांपूर्वी मोठी घरफोडी झाली होती. या घरफोडीचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा करत होती. हा तपास करत असतानापोलिसांच्या हाती एक संशयित लागला. त्यावेळी घरफोडीचा तपास करताना त्याच्याकडून मोठी माहिती समोर आली . आपण नकली सोन्याद्वारे अनेक पतसंस्था आणि बँकांची फसवणूक करून कर्ज प्रकरण केल्याचं त्यांना सांगितलं. या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यानंतर हे एक मोठं रॅकेट असल्याचे निष्पन्न झालं.www.konkantoday.com