
राजापूर तालुक्यातील मिठगवाणे पतसंस्थेत चोरी, साडेचार कोटींची, विमा दोन कोटींचा
राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथील एका पतसंस्थेवर चोरट्यांनी डल्ला मारून कोट्यावधींचा मुद्देमाल लंपास केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. सुमारे साडेचार कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबवल्याचे पुढे येत असले तरी पतसंस्थेने केवळ २ कोटी रुपयांचा विमा उतरवल्याचे पुढे आले आहे. संस्थेच्या खातेदारांचे पैसे बुडू नयेत म्हणून सहकार विभागाने पावले टाकली आहेत.मिठगवाणेतील ग्रामपंचायत कार्यालय इमारतीत एका पतसंस्थेची शाखा आहे. मंगळवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. पतसंस्थेच्या शाखा कार्यालयाच्या बाहेरच्या दरवाजाचे लॉक तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने आतील तिजोरी फोडून त्यातील दागिने लंपास केले. यासंदर्भात सहकार खात्याने प्राथमिक माहिती घेतली आहे.www.konkantoday.com