
अखेर कशेडी बोगद्यातून छोट्या वाहनांसाठीवाहतूक सुरू
गेले अनेक दिवस प्रतीक्षा असलेल्या कशेडी बोगद्यातून छोट्या वाहनांसाठी वाहतूक सुरू झाली आहे यामुळे आपल्या खासगी गाड्याने येणाऱ्या
मुंबईतून गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे. मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी घाटात तयार करण्यात आलेल्या बोगद्यातील एक मार्गिका आज सोमवार (११ सप्टेंबर) पासून हलक्या वाहनांसाठी सुरू करण्यात आली आहे. यामुळे घाटातील अवघड वळणापासून प्रवाशांची सुटका झाली आहे.
कशेडी घाटातील अवघड वळणाचा त्रास कमी करण्यासाठी बोगदा तयार करण्यात आला आहे.
या बोगद्याची लांबी १.७१ किलोमीटर इतकी आहे. गेली तीन वर्षे या बोगद्याचे काम सुरू आहे. गणेशोत्सवापूर्वी या बोगद्यातील एक मार्गिका सुरू करण्याचे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला होता. त्यानुसार सोमवारपासून एक मार्गिका हलक्या वाहनांसाठी खुली करण्यात आली
www.konkantoday.com