
मिक्सर मशिनखाली चिरडून दोन महिलांच्या मृत्यूप्रकरणी मृतदेह ताब्यात घेण्यावरून वाद
मिक्सर मशिनखाली चिरडून दोन महिलांच्या मृत्यूप्रकरणी संबंधित कामगाराचा असलेल्या मुकादमचा चांगला बाजा उडाल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस अधिकार्यांच्या मध्यस्थीने मुकादमकडून आर्थिक मदतीचे ठोस आश्वासन मिळाल्याने अखेर मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला. रात्री उशिरा चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात हा प्रकार घडल्याने गोंधळ उडाला होता.स्लॅबसाठी लागणारी मशिनरी व कामगाारांना चिपळूण खर्डीवरून गुहागरकडे जाणारा टेम्पो शृंगारतळी बरमारे नर्सरीजवळील वळणावर टायर फुटल्याने एका बाजूला उलटला. यामध्ये असणार्या दोन कामगार महिलांवर मिक्सर मशीन पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. हा अपघात गुरूवारी सकाळी ८.३० वा. झाला होता. बेदरकारपणे वाहन चालवल्याप्रकरणी चालकावर गुन्हाही दाखल झाला होता. यानंतर या दोन महिलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते. या अपघाताचे वृत्त कळताच कामागारांचे नातेवाईक चिखली आरोग्य केंद्रात आले होते. संबंधित मुकादमही खेर्डी येथून दाखल झाला होता. मृतांच्या नातेवाईकांनी मुकादमकडे मदतीविषयी विचारणा केली, मात्र त्याने उत्तर द्यायला टाळाटाळ केली. अगोदर तुम्ही मृतदेह ताब्यात घ्या, नंतर आपण चर्चा करू, असे त्याने उत्तर दिल्याने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. www.konkantoday.com