चिपळूण नगर परिषदेने तक्रार अर्ज, व्हिडिओ क्लिप दिली, दोन दिवसात खुलासा करण्याची मुदत
चिपळूण नगर परिषदेने मागणीनुसार माजी आमदार रमेश कदम व अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष रईस अल्वी यांना त्यांच्याविरोधात झालेल्या तक्रारीचा अर्ज, व्हिडिओ क्लीप गुरूवारी दिली आहे. त्यामुळे आता खुलासा देण्यासाठी त्यांना दोन दिवसांची मुदत असून या मुदतीत ते काय खुलासा देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोघांनी लोकसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार शकील सावंत यांच्यावर टीका केल्याचा आरोप असून तशी तक्रार दाखल झाली आहे. www.konkantoday.com