खेडमध्ये नुकत्याच झालेल्या वादळी पावसाचा आंबा बागायतदारांना लाखोंचा फटका

खेड परिसरात गुरूवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वार्‍यासह झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीचा खाडीपट्ट्यातील आंबा बागायतदारांना मोठा फटका बसला आहे. हाता तोंडाशी आलेला घासच वळीवाच्या पावसाने हिरावून नेल्याने आंबा बागायतदारांचे लाखोंचे नुकसान झाले. संपूर्ण आंबा बागायतच उध्वस्त झाल्याने आंबा बागायतदारांवर उपासमारीची वेळ येवून ठेपली असून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button