खाण मालकाने कमर्शिअल मीटर मध्ये छेडछाड करून केली 26 लाखाची वीज चोरी

खेड तालुक्यातील मुळगाव या गावात डोंगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर जांभ्याच्या खाणी सुरू आहे. त्यातील रामचंद्र बुदर या खाण मालकाने कमर्शिअल मीटर मध्ये छेडछाड करून जांभा कट करण्यासाठी लागणार्या मशीनसाठी मोठ्या प्रमाणावर वीज चोरी केली. याबाबत गोपनीय माहिती महावितरणच्या ठाणे येथील भरारी पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी उपकार्यकारी अभियंता उपविभाग लोटे यांच्या सोबत जाऊन थेट मुळगाव येथील जांभा खाण येथे धाड टाकली. यावेळी मोठ्या प्रमाणात त्यांनी वीज चोरी केल्याचे उघड झाले.तसेच महावितरणकडून देण्यात आलेल्या कमर्शियल मीटरमध्ये त्यांनी छेडछाड करून विविध चोरी केल्याचे समोर आले. महावितरणने त्यांना देण्यात आलेल्या दोन्ही मीटरमध्ये छेडछाड केल्याने नियमाप्रमाणे रामचंद्र बाबूजी बदर यांना हजारो युनिट चोरी करून वापरल्याबद्दल दोन बिले अदा करण्यात आली आहेत. त्यामध्ये 13 लाख 34 हजार 390 तर दुसरे बिल 12 लाख 89 हजार 880 अशाप्रकारे 26 लाख 24 हजार 230 रुपयांचे वीज चोरी केल्याची बिल देण्यात आली आहे. तसेच त्यांनी ही रक्कम लवकरात लवकर भरायची आहे. महावितरणच्या ठाणे येथील भरारी पथकाने यासंदर्भात पंचनामा केला असून संबंधित खाण मालक रामचंद्र भागोजी बुदर यांच्यावर पुढील काही दिवसात कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.खेड तालुक्यातील मुळगाव येथील खाण मालकाने महावितरणच्या दोन कमर्शियल मीटर मध्ये छेडछाड करून तब्बल 26 लाख रुपये किमतीची वीज चोरी केल्याचे समोर आले. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही रत्नागिरी जिल्ह्यातली सर्वात मोठी वीज चोरी असल्याचे बोलले जात आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button