
कै. संजीव साळवी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रत्नागिरीत १९ मे रोजी मित्राच्या आठवणींच्या सुरेल यात्रा
मूळचा रत्नागिरीचा परंतु महाराष्ट्र, गोवा अशा दोन्ही ठिकाणी फॅशन फोटोग्राफी, गायन, अभिनय क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारा, कै. संजीव साळवी उर्फ संजू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जीजेसी-९५ गोल्डन फॅमिली प्रेझेंटस, गोल्डन मेमरीजा हा मित्राच्या आठवणींची सुरेल यात्रा कार्यक्रम रविवारी १९ मे रोजी रंगणार आहे.फॅशन फोटोग्रामी, गायन, अभिनय क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारा, वेगळ्या संकल्पना घेवून या क्षेत्रात काम करणारा, आपला मित्र कै. संजीय साळवी उर्फ संजू याच्या स्मृतीप्रित्यर्थ जीजेसी-९५ ग्रुपचे सगळे मित्र आणि संजूचे जिवलग नातलग आणि हितचिंतक मिळून हा कार्यक्रम १९ मे २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आठवडा बाजार रत्नागिरी येथे करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. या कार्यक्रमात संजूच्या आठवणी, त्याचे काही खास फोटोग्राफ्स, रत्नागिरीतील गायकांच्या सुमधुर गीतांचा नजराणा त्याच्या जवळच्या माणसांच्या उपस्थितीत उलगडला जणार आहे. www.konkantoday.com