
केवळ नामांकीत कंपनीचेच पाईप हवेत या अट्टाहासामुळे पाटपन्हाळेतील जलजीवन मिशन योजना बारगळली
केवळ नामांकीत कंपनीचेच पाईप हवेत या अट्टाहासामुळे गुहागर तालुक्ययातील पाटपन्हाळे भेकरेवाडी व गणेशवाडीसाठी मंजूर झालेली ५१ लाखांची जलजीवन मिशन योजना बारगळली आहे. त्यामुळे या कामासाठी अद्यापही मुहूर्त मिळालेला नसल्याचे पाईपलाईनसाठीच्या हट्टाचे मुख्य कारण ठेकेदाराकडून पुढे करण्यात येत आहे.गुहागर तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येने दुसर्या क्रमांकावर असलेल्या पाटपन्हाळे गावाची महत्वाकांक्षी जलजीवन मिशन योजना मंजूर झाली. कार्यक्षेत्रातील शृंगारतळीसाठी सुमारे ५ कोटी, तर पाटपन्हाळे भेकरेवाडी व गणेशवासाठीसाठी ५१ लाखांचा निधी मंजूर झाला. ३ महिन्यापूर्वी मंजूर झालेल्या या योजनेचे काम अजूनही सुरू झालेले नाही. www.konkantoday.com