
बंधपत्रित सेवा पूर्ण करण्याच्या धोरणास वैद्यकीय शिक्षण विभागाची स्थगिती, शिक्षण मंत्री हसन मुश्रिफ यांचे निर्देश.
शासकीय, निमशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुलभ होण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने बंधपत्रित सेवा पूर्ण करण्याच्या धोरणाची अट शिथिल करून या धोरणास स्थगिती देण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रिफ यांनी दिल्या आहेत.
शासकीय, महानगर पालिका यांच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विहित कालावधीची शासनाची बंधपत्रित सेवा पूर्ण केल्याशिवाय उमेदवारांना ए:डी, एमएस तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र ठरवता येणार नाही, असा शासन निर्णय २०१७ साली घेण्यात आला होता. त्यामुळे बंधपत्रित सेवेच्या अटीस स्थगिती देण्यात आल्यामुळे आता पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेणार्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून त्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याची भावना मंत्री मुश्रिफ यांनी व्यक्त केली आहे.www.konkantoday.com