कोचीवली-एलटीटी गाडीने प्रवास करणार्या प्रवाशाची सोन्याची चेन लांबविली
कोकण रेलल्वे मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशाची सोन्याची चेन चोरट्याने लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना १४ मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद शहर पोलिसांत झाली असून पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला.पोलिसांच्या माहितीनुसार तक्रारदार हे १४ मे रोजी कोकण रेल्वे मार्गावरील कोचीवली-एलटीटी गाडीने प्रवास करत होते. रात्री २ च्या सुमारास ही गाडी रत्नागिरी रेल्वेस्टेशननजिक आली असता तक्रारदारांना झोप लागली. यावेळी चोरट्याने तक्रारदारांच्या गळ्यातील २५ ग्रॅम ववजनाची सोन्याची चेन लांबविली, अशी तक्रार शहर पोलिसांत दाखल करण्यात आली.www.konkantoday.com