सिंधुदुर्गात सापडलेल्या चमकणारी अळंबीची अधिकृत नोंद महाराष्ट्राच्या जैविकतेमध्ये
सिंधुदुर्ग जिल्हा हि निसर्ग संपन्न भूमी आहे. या भूमीत वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक सौंदर्य लपलेले आहे. येथे ठिकठिकाणी जैवविविधता आढळते. जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे गावात मंगेश माणगावकर यांच्या परसबागेत गतवर्षी पावसाळ्यात सापडलेली बायोलूमिनिकस मशरूम म्हणजेच चमकणारी अळंबीची अधिकृत नोंद महाराष्ट्राच्या जैविकतेमध्ये झाली आहे.या आधी महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर अभयारण्यात आणि सिंधुदुर्ग मधील तिलारी राखीव संवर्धन क्षेत्रांमध्ये प्रकाशमान बुरशीची नोंद झाली आहे. परंतु होडावडे गावांत सापडलेल्या चमकणाऱ्या अळंबीची नोंद महाराष्ट्रामध्ये प्रथमच झाली असून भारतातील केरळ आणि गोवा राज्यानंतर महाराष्ट्र हे तिसरे राज्य ठरले आहे.www.konkantoday.com