
शासनाच्या गस्ती नौकेने तीन महिन्यात केली एका नौकेवर कारवाई
अनधिकृत मच्छिमारीला पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारने रामभद्र नावाची गस्ती नौका रत्नागिरी जिल्ह्यासाठी निश्चित केली. सुमारे ३ महिने या नौकेने गस्तीसाठीचे काम केले आणि एका अनधिकृत मच्छीमार नौकेवर कारवाई करण्यात मत्स्यव्यवसाय विभागाला यश आले आहे. नौका मालकाला २० हजार रू. दंड करण्यात आला. अनधिकृत मच्छीमारी रोखण्यासाठी स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापन करावा ही मागणी मात्र सरकार दरबारी पडून आहे.समुद्र किनार्यावर अनधिकृत मच्छीमारीमुळे धुमाकूळ घातला आहे. प्रचंड प्रमाणात होणार्या अनैतिक मच्छीमारीमुळे सध्या माशांच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. यामुळे मत्स्य प्रक्रिया व्यवसाय अडचणीत सापडला आहे. अनैतिक मच्छीमारी अशीच चालू राहिल्यास येत्या काही कालावधीत समुद्रातून मासे मिळणे जवळपास बंद होईल असा इशारा कोकण कृषी विद्यापीठाने यापूर्वीच दिला आहे.www.konkantoday.com