
राजापूर तालुक्यातील मिठगवाणेतील श्रमिक पथसंस्थेच्या चोरीमध्ये स्थानिकांचा हात?
राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथील श्रमिक पतसंस्थेच्या शाखेत मोठ्या प्रमाणात सोनेतारण कर्जाची उचल होत असल्याची माहती असलेल्या व्यक्तीने किंवा त्याच्या माहितीवरून अन्य चोरट्यांनी ही चोरी केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. या चोरीचे स्थानिक कनेक्शन तपासण्यासाठी गाव व परिसरात गावाबाहेरून आलेल्या व्यक्तीचा पोलिसांकडून कसून शोध सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.चोरट्यांना लवकरच जेरबंद केले जाईल असे कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी सांगितले. तपासासाठी जिल्हा पोलिसांनी विविध पथक स्थापन करून तपासचक्रे वेगाने फिरविली आहेत. नाटे पोलिसांसह रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक दरोडेखोरांचा शोध घेण्यात व्यस्त आहे. www.konkantoday.com