मुंबई-नायगाव-जूचंद्र असा नवा बायपास बांधून बोरिवली कोकण रेल्वे मार्गाला जोडण्याच्या कामाला मंजुरी
मुंबई-नायगाव-जूचंद्र असा नवा बायपास बांधून बोरिवली कोकण रेल्वे मार्गाला जोडण्याच्या कामाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार मंजुरी देण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कांदिवली येथे भरलेल्या कोकणवासीयांच्या मेळाव्यात दिली.याच वेळी हार्बर मार्ग बोरिवलीला जोडण्याच्या आणि वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू करण्याच्या कामांनाही मंजुरी देण्यात आल्याचे वैष्णव यांनी स्पष्ट केले. उत्तर मुंबईतील लोकसभा मतदारसंघातील भाजप आणि महायुतीचे उमेदवार पियूष गोयल यांनी या मेळाव्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे बोरिवली स्थानक कोकण रेल्वेला जोडण्यात यावे, गोरेगावपर्यंतचा हार्बर रेल्वेमार्ग बोरिवलीला जोडण्यात यावा; तसेच वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू करण्यात यावी, अशा तीन मागण्या केल्या.त्यावर पंतप्रधान मोदी यांच्या निर्देशानुसार, या तिन्ही कामांना मंजुरी देण्यात आल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. हार्बर रेल्वे बोरिवलीपर्यंत आणण्यासाठी ८२६ कोटी रुपयांची, तर नायगाव-जूचंद्र बायपाससाठी १७६ कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहितीही रेल्वेमंत्र्यांनी दिली.www.konkantoday.com