मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुलांची कामे रखडली, पूर्ण होण्यास २०२६ उजाडणार..?
मुंबई-गोवा महामार्गाचे स्वप्न डिसेंबर २०२४ अखेर पूर्ण होताना कठीण बनले आहे. महामार्गावरील काही अपूर्ण भागासोबतच नद्यांवरील पूल, उड्डाणपुलांची कामे रखडली असून, ही कामे पूर्ण होण्यास आणखी दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे यंदाही रत्नागिरी जिल्हयातून चौपदरीकरणावरून प्रवास करण्याचे स्वप्न अपूर्णच राहणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम सिंधुदुर्ग जिल्हयात पूर्ण झाले असून, रत्नागिरी जिल्हयात राजापूरमध्ये वाकेडपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. कशेळी ते परशुरामपर्यंतचा टप्पाही जवळपास पूर्ण झाला आहे त्यात परशुराम ते अरवलीपर्यंत तीन साडेतीन किमीचा भाग अपूर्ण असून, त्यात चिपळूणातील सुमारे पावणेदोन किलोमीटरच्या फ्लायओव्हरचा समावेश आहे.आरवलीजवळील गडनदीवरील फूल पूर्ण झाला असून, जोडरस्त्यांची कामे अपूर्ण आहेत आरवली येथील उडाणपुलाच्या जोडरस्त्याचे काम अपूर्ण राहिले आहे. शास्त्री नदीवरील पूल पूर्ण झाला असला तरी जोडरस्त्याचे काम अपूर्णावस्थेत आहे. संगमेश्वर एसटी स्टॅण्डजवळील पुलाचे कामही प्रगतिपथावर असून, त्यावर गर्डर चढवण्याचे काम बाकी असून, या ठिकाणीही जोडरस्त्याचे काम आणि एसटी स्टॅण्डजवळ अंडरपासची कामे अपूर्णावस्थेत आहेत, सप्तलिंगी नदीवरील पूलही पूर्ण झाला असून त्याचा जोडरस्ता अपूर्ण आहे. या महामार्गावरील प्रमुख पूल असलेल्या बावनदीचे पिलर तयार असून याठिकाणी गर्डर चढ़वण्याचे व जोडरस्त्याचे काम शिल्लक आहे. काळाहीनदीवरही रोडरस्त्याचे कामअपूर्ण आहे. लांजा, पाली व निवळी, हातखंबा येथील अंडरपास उड्डाणपुलांची कामे रखडली आहेत.पुलांच्या जोडरस्त्यासाठीही वेगळा निधी उपलब्ध करुन द्यावा लागणार आहेत, त्यासाठी वेगळी निविदा प्रक्रिया केली जाणार असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.हे सर्व पुलांची कामे पूर्णत्वास जाण्यास आणखी दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागणार असल्याने डिसेंबर २०२५ किंवा ने २०२६ पर्यंतचा कालावधी लागणार असल्याचे चित्र आहे.www.konkantoday.com