बोटीच्या तांडेलला आलेल्या डुलकीमुळे बोट चढली खडकावर, गुहागर तालुक्यातील घटना
गुहागर तालुक्यातील मच्छीमारीसाठी आलेली परंतु बोर्या बंदरावर विसावण्यासाठी जाणारी हर्णै बंदरातीलल बोट तांडेलला आलेल्या डुलकीमुळे चक्क खडकावर चढून अडकली. सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. बोटीसह तांडेल, खलाशी असे सातहीजण सुखरूप आहेत. ही घटना गुहागर तालुक्यातील बोर्या समुद्रकिनारी देवीच्या डोंगरालगत बुधवारी मध्यरात्री १२ वाजता घडली. गुरूवारी दिवसभर बोट काढण्यच्या प्रयत्नाला यश आलेले नाही. मात्र बोटीमधील इंजिन काढण्यात आले असून यामध्ये सुमारे ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाले आहे.दापोली तालुक्यातील हर्णै येथील हरेश वासुदेव कुलाबकर यांच्या मालकीची जानकी आयएनडी एमएच-४ एमएम १६६९ ही मच्छीमार बोट आहे. बुधवारी रात्री हर्णै बंदरातून गुहागरच्या समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी ही बोट जोराच्या वार्यामुळे बोर्या बंदरात विसावण्यासाठी येत होती. बोटीवर नरेश पालकर हे तांडेल तर ७ खलाशी होते. www.konkantoday.com