बागेची राखण व्यवस्थित करीत नाही असे सांगितल्याने बोरजमध्ये तरूणाची गळफासाने आत्महत्या
आंब्याच्या बागेची राखण व्यवस्थित करत नसल्याने येथील २४ वर्षीय तरूणाने आंब्याच्या बागेतच झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. मनोज मानाजी हिलम असे मृत तरूणाचे नाव आहे. यातील मृत तरूण हा रागीट स्वभावाचा होता ५ वर्षापूर्वी त्याने बोरज येथील आंब्याच्या बागेत गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. हिलम कुटुंबियांनी गुहागर तालुक्यातील नरवण येथील आंब्याची बाग राखण्यास घेतली होती. येथे हा तरूण बागेची व्यवस्थित राखण करत नसल्याने त्याची आई त्याला ओरडली. या रागातून त्याने झाडाच्या फांदीला नायलॉनच्या साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी येथील पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.www.konkantoday.com