
पेढे-फरशी तिठा येथे फुटलेल्या पाईपलाईन दुरूस्ती ३६ तासानंतर पूर्णत्वास
मंगळवारी पेढे-फरशी तिठा येथे फुटलेल्या पाईपलाईनची दुरूस्ती तब्बल ३६ तासानंतर गुरूवारी सकाळी पूर्णत्वास गेली. आवश्यक यंत्रसामुग्रीसह एमआयडीसीचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह कै. डी. कन्स्ट्रक्शनचे तब्बल ६० कामगार यासाठी दिवसरात्र झटल्यानंतर लोटे औद्योगिक वसाहतीसह परिसराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात एमआयडीसीला यश आले आहे. www.konkantoday.com