पावसाळा सुरू होणार असल्याने आरवली-कांटे ७ कि.मी.चे डांबरीकरणासाठी धावपळ
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या अपूर्ण असलेल्या कामामुळे यंदाच्या पावसाळ्यात खोदाईमुळे अनेक अडचणी उभ्या राहण्याचा धोका आहे. या महामार्गावर वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जोरदार धावपळ सुरू आहे. आजमितीला ३ टप्प्यातील ४ कि.मी.चे चौपदरीकरण अपूर्णावस्थेत असून हा मार्ग पूर्ण व्हायला डिसेंबर २०२४ उजाडणार आहे. त्यामुळे वाहनधारकांची पर्यायी व्यवस्था म्हणून आरवली ते कांटे टप्प्यातील ७ किमीचे डांबरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी अडीच कोटींचा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकार्यांना सादर केला जाणार आहे.www.konkantoday.com