
निकृष्ठ दर्जाचा आरोप करत तुरळ-चिखली रस्त्याचे काम ग्रामस्थांनी थांबवले
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ ते चिखली या रस्त्याचे काम दोन महिन्यापूर्वी सुरू करण्यात आले. मात्र ते निकृष्ट असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी काम बंद पाडले आहे.सदर रस्त्याचे काम पूर्वी चांगले न झाल्याने केवळ वर्षभरातच हा रस्ता खराब झाला होता. मात्र पुन्हा निकृष्ठ काम करणार्या त्याच ठेकेदाराला हे काम देण्यात आल्याचे व काम निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.www.konkantoday.com




