
चिपळूण-वालोपो येथील पाईपलाईन दुरूस्ती युद्धपातळीवर सुरू
चिपळूण-वालोपो येथून खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीसह परिसराला पाणीपुरवठा करणारी एमआयडीसीची पाईपलाईन मंगळवारी सायंकाळी फुटल्यानंतर दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. याप्रकरणी महसूल, ग्रामपंचायत आणि एमआयडीसीने केलेल्या पंचनाम्यानुसार तेथील ९ दुकानांचे सुमारे तेरा लाखाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, लोटे एमआयडीसीसह परिसरातील गावांचा पाणीपुरवठा गेल्या २४ तासाहून अधिक काळ खंडीत झाला आहे. तसेच गुहागर, चिपळूणकडून येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली.www.konkantoday.com