चिपळूण-कराड मार्गावर टँकरच्या धडकेने कामगारांसह चालक जखमी
चिपळूण-कराड मार्गावर सोनपात्राच्या वळणावर काम सुरू असताना टँकरची मिक्सरला धडक बसून कामगारांसह टँकरचालक जखमी झाल्याची घटना १४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. याप्रकरणी बुधवारी टँकर चालकावर अलोरे-शिरगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रविशंकर बद्रीनाथ यादव (गुजरात) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. या अपघातात आकुबाई प्रकाश जाधव (३९), शोभा प्रकाश जाधव (२०), अश्विनी मनिष पवार (२६, पोफळी-साळवी स्टॉप) हेही जखमी झाले आहेत.www.konkantoday.com