
गुहागर आगारातील पाणी व विजेचे प्रश्न ऐरणीवर
गुहागर आगारातील स्वच्छता व पिण्याच्या पाणी व्यवस्था या दोन सुविधांचा अपवाद सोडल्यास इतर अनेक समस्या ऐरणीवर आल्या आहेत. आगाराच्या आवारातील कॉंक्रीटीकरणाचे काम रखडले असून यामुळे विद्युतीकरणाच्या कामातही बाधा आल्याने प्रवासी सध्या अंधारात चाचपडत आहेत. अचानक रद्द होणार्या फेर्यांमुळे प्रवासी त्रस्त असतानाच प्रवाशांना अंधारात चाचपडत बसमध्ये चढावे लागत आहे. तसेच आवारातील कॉंक्रीटची खडी वर आल्याने तीदेखील प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. www.konkantoday.com