
मामाला घरी बोलावून मारहाण करून त्याचा खून करणार्या भाच्यास जन्मठेप
मामाला घरी बोलावून मारहाण करून त्याचा खून करणार्या आरोपीला चिपळूण जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. गतवर्षी सुरू झालेल्या चिपळूण सत्र न्यायालयात पहिलीच शिक्षा आहे. पाच वर्षापूर्वी तालुक्यातील कळकवणे येथे ही घटना घडली होती.
विनोद बाबा सकपाळ (३४) असे जन्मठेप झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना २ जुलै २०१७ ला घडली होती. तालुक्यातील कळकवणे येथील विनोद याने कादवड येथील आपल्या मामास घरी बोलावून त्यांचा खून केला होता. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
www.konkantoday.com