गाणे खडपोली औद्योगिक वसातीमधील कृष्णा ऍन्टीऑ क्सिडेंटस कंपनीत केमिकलचा ड्रम फुटल्याने पाच कामगार भाजले

चिपळूण तालुक्यातील गाणे खडपोली औद्योगिक वसातीमधील कृष्णा ऍन्टीऑ क्सिडेंटस कंपनीत केमिकल ड्रम फुटल्याने पाच कामगार भाजल्याची घटना १३ मे रोजी दुपारी घडली. भाजलेल्या कामगारांवर चिपळूण तसेच मुंबई येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.खडपोली औद्योगिक वसाहतीतील सोमवारी दुपारच्या वेळेत केमिकल ड्रम ट्रकमध्ये भरण्याचे काम सुरू होते. ड्रम भरताना फुटल्याने तेथे काम करणारे पाच कामगार भाजून जखमी झाले. घटनेनंतर कंपनी व्यवस्थापनाने जखमी कामगारांनाा शहरातील खाजगी रूग्णालयात दाखल केले. संतोष कदम, संजय सुर्वे, तुषार बैकर या तिघांना रूग्णालयाच्या सल्ल्यानुसार नवी मुंबईतील ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button