कशेडी बोगद्याच्या दुतर्फा वाहतुकीतील गोंधळ कायम, नियम धाब्यावर बसवून अवजड वाहतूक सुरूच
मुंबई-गोवा महामार्गाववरील बहुचर्चित कशेडी बोगद्याातील हलक्या वजनांच्या दुतर्फा वाहतुकीमुळे चाकरमान्यांचा प्रवास वेगवान झाला असला तरी वाहतुकीतील गोंधळ अजूनही कायम आहे. बोगद्यातून दोन्ही बाजूनी बिनधास्तपरणे अवजड ववाहने धावत असल्याने वाहतूक व्यवस्थेचा पुरता फज्जा उडाला असून वाहतूक कोंडी ऐरणीवर आली आहे. अवजड वाहतुकीच्या अटकावासाठी हाईट खांबची उभारणी करूनही अवस्था २ दिवसात उखडण्यात आले. यामुळे राष्ट्रीय महामार्ग खात्यााने आणखी मजबूत हाईट खांब उभारण्याचे संकेत दिले होते. मात्र प्रत्यक्षात याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही.उन्हाळी सुट्टी हंगामासह लग्नसराई व जत्रोत्सवामुळे महामार्गावर वाहनांच्या वर्दळीत कमालीची वाढ झाली आहे. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर कशेडी बोगदा केवळ हलक्या वजनाच्या वाहनांसाठी दुतर्फा वाहतूक खुली झाल्यापासून दोन्ही बाजूनी अवजड वाहने धावत आहेत. अवजड वाहतुकीला ब्रेक लावण्यासाठी पोलादपूर हद्दीतील भोगाव येथे व तालुक्यातील खवटी येथील अनुसया हॉटेल येथे बोगद्यापासून काही अंतरावर हाईट खांब उभारण्यात आले होते. मात्र २ दिवसात हाईट खांब उखडण्याचे प्रताप अवजड वाहतुकीच्या वाहनचाकांकडून करण्यात आले. अवजड वाहतुकीला ब्रेक लावण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अभियंता पंकज गोसावी यंनी आणखी मजबूत हाईट खांब उभारून अवजड वाहतुकीला मज्जाव करणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र अद्यापही राष्ट्रीय महामार्ग खात्याने आणखी मजबूत हाईट खांब उभारण्याची तसदी घेतलेली नाही. www.konkantoday.com