ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांना घरात घुसून मारहाण; लाइव्ह व्हिडिओ केला शेअर
शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या अयोध्या पौळ यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. काही महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरात घुसून ही मारहाण केली, असा आरोप अयोध्या पौळ यांनी केला आहे. या घटनेनंतर त्यांनी सोशल मीडियावर लाइव्ह व्हिडिओ करून मारहाण झाल्याचे सांगितले आहे. यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्या असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.www.konkantoday.com