
वाशिष्ठी नदीत आपत्ती व्यवस्थापन शिबिरामार्फत प्रशिक्षणाचे धडे
वाशिष्ठी नदीत चिपळूण शहरातील गांधारेश्वर येथे मंगळवारी पोहण्याचा थरार अनेकांना अनुभवता आला. निमित्त होते नगर परिषद आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे. यावेळी आपत्ती काळात स्वतः सुरक्षित राहून मदत करता आली पाहिजे असा सल्ला पुणे येथील अस्तित्व लाईन सेव्हिंग प्रा. लिमिटेडचे प्रमुख भूषण देशपांडे यांनी दिला.पावसाळ्यात उदभवणार्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने शहरातील गांधारेश्वर येथे दोन दिवस प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. त्याचे देशपांडे हे मुख्य मार्गदर्शक आहेत. या कार्यशाळेत नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक असे १०९ जण सहभागी झाले आहेत. त्यांना मार्गदर्शन करताना देशपांडे बोलत होते. www.konkantoday.com