राजापूर तालुक्यातील जानशी कातळ सडा येथे बिबट्याचे पिल्लू मृता अवस्थेत सापडले
राजापूर तालुक्यातील जानशी रस्ता येथील कातळसडा या ठिकाणी महेश पटवर्धन यांच्या मालकीच्या बंदीस्त चिरा कंपाऊंडच्या बाजूला रस्त्यालगत बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आले आहे.वनविभागाकडून या मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जानशी रस्ता येथील कातळसडा या ठिकाणी रस्त्यालगत बिबट्या मृत अवस्थेत पडला असल्याची माहिती पोलिस पाटील राजेंद्र कृष्णा तांबे यांनी परिमंडळ वन अधिकारी राजापूर यांना दूरध्वनी वरून दिली. त्यांनंतर वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी येऊन पाहणी केली, असता सदरचा बिबट्या बछडा हा रस्त्याच्याकडेला मृत आवस्थेत पडला होता. सदर मृत बिबट्या बछडा हा मादी असून त्याचे वय साधारण तीन महिने असल्याचे वनविभागाने सांगितले.www.konkantoday.com