रत्नागिरीचे सुपुत्र महेश पोटफोडे यांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती
रत्नागिरीचे सुपुत्र आणि शहरातील तांबट आळीतील रहिवासी महेश पोटफोडे यांची सीआयडी क्राईम विभागात पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली आहे. मुंबहूतून पुणे विभागात ते लवकरच रूजू होतील.रत्नागिरीतील वायरलेस विभागात त्यांनी आपल्या नोकरीची सुरूवात केली. खात्यांतर्गत परीक्षा देवून ते फिंगरप्रिंट एक्स्पर्ट म्हणून काही काळ मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व परत मुंबई येथे काम केले. येथे काम करताना त्यांनी अनेक अवघड गुन्ह्यांची उकल करताना आपले कसब पणाला लावले. www.konkantoday.com