
पुढील दीड महिन्यांत वांद्रे ते मरीन ड्राईव्ह दरम्यानचा प्रवास फक्त 12 मिनिटांत करणे शक्य
मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पातील आव्हानात्मक टप्प्यातील अडीच हजार मेट्रिक टन वजनाचा ‘बो स्ट्रिंग आर्च गर्डर’ बुधवारी पहाटे यशस्वीपणे बसवण्यात आला.विशेष म्हणजे, 3 वाजता सुरू झालेले हे काम 6 वाजून 7 मिनिटांनी संपले. याचाच अर्थ, 3 तास 7 मिनिटांत दुसरा गर्डर बसवण्याचे मिशन फत्ते झाले. समुद्रातील भरती आणि ओहोटीचे चॅलेंज स्वीकारत दुसरा गर्डर यशस्वीपणे बसवण्यात आल्याने अभियांत्रिकी आविष्कार घडला आहे. पहिला बो स्ट्रिंग आर्च गर्डर 26 एप्रिल रोजी बसवण्यात आला, तर दुसरा गर्डर बुधवार 15 मे रोजी बसवण्यात आल्याने पुढील दीड महिन्यांत वांद्रे ते मरीन ड्राईव्ह दरम्यानचा प्रवास फक्त 12 मिनिटांत करणे शक्य होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.www.konkantoday.com