
दै. प्रहारच्या उपसंपादिका सुश्मिता साळवी यांचे आकस्मिक निधन
रत्नागिरी (वार्ताहर)रत्नािगरी येथील दै. प्रहारच्या उपसंपादिका सौ. सुश्मिता संजय साळवी (वय ५०) यांचे गुरूवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने िनधन झाले. रत्नािगरीतील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक संजय साळवी यांच्या त्या पत्नी होत. वृत्तपत्र क्षेत्रात गेली २० ते २५ वर्षे त्या कार्यरत होत्या. या क्षेत्रात कार्यरत असताना सर्वांशीच त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. एक हसतमुख, खेळकर व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. बुधवार दिनांक १५ मे रोजी सुद्धा त्या नेहमीप्रमाणे दै. प्रहार कार्यालयात कार्यरत होत्या. सर्वांशी हसून-खेळून असलेल्या सौ. सुश्मिता साळवी यांना गुरूवारी (१६ मे) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अचानक हृदयविकाराचा तीव्र धक्का आला व त्यातच त्यांचे निधन झाले. सौ. साळवी यांच्या आकस्मिक झालेल्या निधनाने त्यांच्या कुटुंबीय, नातेवाईक व मित्रमंडळींसह सर्वांनाच धक्का बसला. यावेळी साळवी कुटुंबीयांना अनेकांनी भेटून धीर िदला व सांत्वन केले.त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी चर्मालय येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, उद्योजक केशवराव इंदुलकर, निलेश साळवी, नलावडे यांच्यासह अनेक प्रतिष्ठीत मंडळी उपस्थित होती. त्यांच्या पश्चात पती संजय साळवी, मुली प्रांजली व श्रिया तसेच सासू प्रतिभा साळवी असा परिवार आहे.