जिल्हा परिषदेच्या शाळांतील मोफत गणवेशाचे कापड विद्यार्थ्यांना कापून मिळणार

जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना जूनपासून सुरू होणार्‍या शैक्षणिक सत्रांपासून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटामार्फत गणवेश शिवून मिळणार आहेत. यामुळे शाळा व्यवस्थापन समितीचे अधिकार कमी करण्यात आले असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी त्या त्या गावातील बचतगटांतील महिलांकडून विद्यार्थ्यांना गणवेश शिवून मिळणार होते. यावेळी शासनाने बचत गट सक्षम करण्यावर भर दिला तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या पालकांमधून होणार्‍या तक्रारी दूर होणार असा फायदा पाहिला होता. आता मात्र यामध्ये बदल करताना गणवेश कटींग करून बचत गटांच्या महिलांकडे दिले जाणार आहेत. यावेळी वर्गानुसार उंची, जाडी ठरविण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिवून देण्यात येणारा गणवेश योग्य होईल काय याबद्दल शंकाच आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button