जिल्हास्तर बुद्धीबळ स्पर्धेत सई प्रभूदेसाई विजेती

रत्नागिरी येथे मॅजिक स्क्वेअर चेस ऍकॅडमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कै. मीरा वासुदेव सावंत स्मृती १७ वर्षाखालील जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद रत्नागिरीच्या सई प्रभूदेसाईने पटकावले. सईने अपरााजित राहत साडेपाच गुणांसह निर्विवाद प्रथम स्थान प्राप्त केले.स्विंग लीग पद्धतीने सहा फेर्‍यांमध्ये झालेल्या याा स्पर्धेत राजरत्न व्हनकटे, आयुष रायकर व रूमिन वास्ता या तिघांनीही साडेचार गुण प्राप्त केले. परंतु सरस टाय ब्रेकच्या आधारावर राजरत्नने उपविजेतेपद प्राप्त केले. आयुषने तृतीय क्रमांक पटकावला तर रूमीनला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. प्रत्येकी चार गुण मिळवत मिहीर काणेकर व कौस्तुभ हर्डीकर यांनी अनुक्रमे पाचवा व सहावा क्रमांक पटकावला.निधी मुळ्येने साडेचार गुणांसह मुलींमध्ये सर्वोत्तम उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले. तर अनरेटेड खेळाडूंचे प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक ज्योतिरादित्य गडाळे याने पटकावले. १५ वर्षाखालील वयोगटात मंडणगडचा हर्ष चव्हाण, १२ वर्षाखालील वयोगटात आर्या पळसुलेदेसाई तर ९ वर्षाखालील वयोगटात विंग सावंत यांनी सर्वोत्तम कामगिरी केली. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button