चिपळूण गुहागर मार्गावर टेम्पोला भीषण अपघात

रत्नागिरी:- चिपळूण गुहागर मार्गांवर गाडीचा टायर फुटून टेम्पो वळताना पलटी झाला. या घटनेत दोन महिला कामगारांचा गाडीत चिरडून मृत्यू झाला आहे. घरावरील स्लॅब टाकण्यासाठी मशिनरी आणि कामगार यांना घेऊन जात असताना टायर फुटून अपघात झाला . गुहागर पोलीस घटना स्थळी रवाना झाले आहेत. गुहागर चिपळूण मार्गावरील शृंगारतळी येथील वळणावर टेम्पो पलटी झाला. दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच जवळील गावातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. महिलांच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button