चिपळूण आगारात प्रवासी भारमान वाढले

सुट्टी हंगामात चाकरमानी बहुसंख्येने गावी डेरेदाखल होत असल्याने चिपळूण आगारात प्रवासी भारमान वाढले आहे. यावेळी गावच्या दिशेने जाणार्‍या एस.टी. गाड्या तुडुंब भरून जात आहे. याशिवाय मुंबई, पुण्याकडे जाण्यासाठी आगारातून जादा फेर्‍यांचे नियोजन देखील करण्यात आले आहे.मे महिना हा शालेय सुट्टीचा हंगाम असल्याने या महिन्यात विशेष करून मुंबई, पुणे येथील चाकरमानी गावच्या दिशेने येत असतात. त्यामुळे येथील मध्यवर्ती बसस्थानकात प्रवासी भारमान वाढले असून सद्यस्थितीत बसस्थानकाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे गावच्या दिशेने जाणार्‍या एसटी गाड्या तुडुंब भरून जात आहेत. असे असताना बसस्थानकातून सोडण्यात येणार्‍या गाड्या उशिराने धावत असल्याने चाकरमानी प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button