चिपळूण खेड शहराला गुरुवारी दुपारी अवकाळी पावसासोबत चक्रीवादळाचा फटका
चिपळूण खेड शहराला आज गुरुवारी (दि.१६) दुपारी ३ ते ४ या वेळेत अवकाळी पावसासोबत चक्रीवादळाचा फटका बसला आहे. या वादळात खेड -दापोली मार्गासह शहरातील विविध भागात महाकाय वृक्ष कोसळले.दुकाने, घरे यासह निवासी संकुलांचे देखील वादळात नुकसान झाले आहे.खेडमध्ये गुरुवारी (दि.१६ मे) दुपारी झालेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळाने मोठे नुकसान केले आहे. खेड – दापोली मार्गावर खेड पंचायत समिती समोर महाकाय वृक्ष कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे अर्ध्या तासाने वाहतूक पूर्ववत करण्यात यश आले. या ठिकाणापासून काही अंतरावर असलेल्या टेलिफोन एक्सचेंजच्या बाजूलाच एक दुसरे मोठे झाड कोसळले. शहरातील स्वरूप नगर भागात देखील झाड कोसळले असून अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून वीज वाहिन्यांवर कोसळल्या. अनेक भागात वीज पुरवठा खंडित झालाwww.konkantoday com