कोकण रेल्वे मार्गावरील कुर्ला मडगाव एक्सप्रेसमध्ये ५१ हजारांची चोरी
कणकवली रेल्वे स्टेशन ते चिपळूण रेल्वे स्टेशन प्रवासादरम्यान ट्रेन नं. १११०० कुर्ला मडगाव एक्सप्रेसच्या कोच नं. एस ६ सीट नं. ५५ वरून बसून झोपून प्रवास करीत असताना दि. १३ मे रोजी रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान ९०० रुपयांची सॅक बॅग व त्यामधील ५० हजारांचा लॅपटाीप व रोख रक्कम व कागदपत्रे चोरीस गेली. फिर्यादी प्रसाद प्रल्हाद कानसे (२८, रा. देवजीमुंडे चाळ, हमुनाम गल्ली, कांजूरमार्ग पूर्व, मुंबई) याने चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार अज्ञात आरोपीने फिर्यादी हे ट्रेन नं. १११०० कुर्ला मडगाव एक्सप्रेसच्या कोच नं. एस ६ सीट नं. ५५ वरून बसून झोपून सावंतवाडी ते पनवेल असा प्रवास करीत असताना सुमारे २.१० वा. ते ५.५० वा. च्या दरम्यान कणकवली रेल्वे स्टेशन ते चिपळूण रेल्वे स्टेशन प्रवासादरम्यान फिर्यादीच्या झोपेचा फायदा घेून सीटवर डिकीजवळ ठेवलेली ९०० रुपयांची सॅक बॅग व त्यामधील ५० हजारांचा लॅपटॉप व रोख रक्कम व कागदपत्रे चोरून नेली म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. www.konkantoday.com