आता वाहन चालकांना खाजगी संस्थांकडून मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स,
१ जूनपासून अंमलबजावणीड्रायव्हींग लायसन्स मिळवण्यासाठी आता आरटीओ कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यासाठी खाजगी संस्थांना सदर चाचण्या घेण्यास प्रमाणपत्र देण्यास सांगण्यात आले आहे. येत्या १ जूनपासून याची अंमलबजावणी होणार आहे.ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी वाहन चालकाला लेखी परीक्षेपासून ते वाहन चालविण्याची चाचणी द्यावी लागते. या सर्व प्रक्रियेत आठवडा तर नक्कीच निघून जातो. परंतु, आता वाहन चालकाची या सर्व प्रक्रियेतून सुटका होणार आहे.रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्रालय ड्रायव्हिंग लायसन्सबाबतच्या नियमात त्याचप्रमाणे नियमांच्या अन्य बदलानुसार अंमलबजावणीही होणार आहे. त्यात या नव्या नियमानुसार, वेग मर्यादेपक्षा अधिक वेगाने गाडी चालवली तर चालकाला एक हजार ते दोन हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागेल. एखादा अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना पकडला गेल्यास त्याला २५ हजार रुपये दंड भरावा लागेल, इतकेच नव्हे तर, ज्या व्यक्तीचे वाहन आहे त्या व्यक्तीचे ड्रायव्हींग लायसन्स रद्द केले जाईल. www.konkantoday.com