अनधिकृत मासेमारी करणार्या ४३ जणांवर कारवाईचा बडगा
राज्याच्या सागरी क्षेत्रात नियमबाह्य अनधिकृत आणि एलईडी प्रकाशात होणार्या मासेमारीवर सहाय्यक मत्स्य आयुक्त विभागामार्फत कारवाई केली जात आहे. आतापर्यंत गेल्या १ ऑगस्ट २०२३ ते १० मे २०२४ या कालावधीत ४३ नौकांववर कारवाई करण्यात आली आहे. त्या नौकांवर ८१ लाख ५९ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.१ जून ते ३१ जुलै हा कालावधी पावसाळी मासेमारी बंदी कालावधी म्हणून शासनाने जाहीर केला आहे. या काळात मासेमारी पूर्णतः बंद असते. कोकणातील समुद्रात दोन महिन्यांचा मासेमारी बंदी कालावधी संपल्याानंतर ऑगस्ट महिन्यापासून नव्या मासेमारी हंगामाची सुरूवात होत असते. या हंगामाच्या पार्श्वभूमीवर दर्यावर मच्छिमार बांधव स्वार होतो. मासेमारीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल देखील होत असते. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यांच्या समुद्र हद्दीत अनेक वेळा परराज्यातील नौकांची घुसखोरी होते. त्यांची खुसखोरी येथील नौकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. तसेच समुद्रात १२ नॉटीकलच्याा आत एलईडी प्रकाशात मासेमारी करणार्या अनेक मच्छिमारी नौकांचा वावर होताना दिसतो. जानेवारीपाासून राज्याच्या जलधी क्षेत्रात म्हणजे १२ नॉटीकल मैलाच्या आत समुद्रात पर्ससीननेट मासेमारी करण्यास बंदी असते. अशा अवैध मासेमाारी करणार्या नौकांवर वेळोवेळी गस्तीद्वारे सहाय्यक मत्स्य आयुक्त विभाग नजर ठेवून असतो. www.konkantoday.com