
अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर वाहन खरेदीद्वारे कोट्यावधींची उलाढाल
साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर नवीन वाहने खरेदीद्वारे कोट्यावधी रुपयांची उलाढाल रत्नागिरी शहरात झाली आहे. नवीन वाहने, सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांच्या खरेदीकडे नारिकांचा सर्वाधिक कल होता. सोने खरेदीसह वास्तूप्रवेश, विवाह आदी शुभ कार्यासाठी अक्षय तृतीया महत्वाची मानली जाते. अनेक नागरिकांनी नवीन फ्लॅट खरेदी केले असून दुचाकी, चारचाकी वाहनांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात झाली आहे. गुढीपाडव्याला सोन्याचा दर प्रतितोळा ७५२०० रुपये इतका होता. अक्षय तृतीयेला सोन्याचा दर प्रतितोळा ७२५०० रुपयांपर्यंत घसरला होता. सोने खरेदीसाठी नागरिकांनी सराफांच्या दुकानात मोठी गर्दी केली होती. गृहोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल खरेदीसाठी नागरिकांची संबंधित दुकानात मोठी गर्दी केली होती. www.konkantoday.com