सचिन तेंडुलकर यांच्या बॉडीगार्डची आत्महत्या

सचिन तेंडुलकर यांच्या बॉडीगार्डने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेत त्यांनी आत्महत्या केली. जामनेर शहरातील जळगाव रोडवरील गणपती नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या प्रकाश गोविंदा कापडे (वय 37) यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.प्रकाश कापडे हे SRPF मध्ये भरती झाले होते. त्यानंतर त्यांची पोस्टिंग होऊन ते मुंबई येथे सचिन तेंडुलकर यांचे बॉडीगार्ड म्हणून कर्तव्यावर होते. आठ दिवसांपासून कापडे मुंबई येथून जामनेर येथे आपल्या गणपती नगर येथील घरी आले होते. रात्री 1 वाजेच्या सुमारास प्रकाश कापडे यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. यावेळी घरातील सर्व झोपले होते. गोळीबाराचा आवाज आल्यानंतर घरातील लोक धावत आले तेव्हा प्रकाश हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button