
चिपळूण नगर परिषदेने दिला ५१ महिला रूग्णांना मदतीचा हात
चिपळूण शहरातील दुर्धर आजार असणार्या ५१ महिलांना नगर परिषदेच्या महिला व बालविकास विभागाकडे प्रत्येकी १० हजार रूपयांची मदत देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना याचा मोठा फायदा होणार असून या रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनी प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत. जिल्ह्यातील हा पहिला वेगळा उपक्रम असून दरवर्षी ही मदत दिली जाणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून महिला व बालविकास विभाग शहरातील महिला व मुलांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. यावर्षी महिलांसाठी विविध प्रकारचे अनेक उपक्रम राबवले गेल्याने त्याचा महिलांना मोठा लाभ झाला असून महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे उपक्रम राबवण्याबरोबरच महिलांना आर्थिक मदत करण्याबाबत प्रशासनाचा विचार सुरू होता. यातूनच मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी आजारी महिलांना दरमहा येणारा खर्च, त्यामुळे काही रूग्णांची होणारी दमछाक याचा विचार करून त्यांनाच आर्थिक मदत करण्याची संकल्पना पुढे आणली. या विभागाचे प्रमुख प्रसाद साडविलकर यांनी अर्ज वाटप केले होते.
www.konkantoday.com