राजापूर तालुक्यातील मिठगावणे येथील पतसंस्था फोडून चोरट्यांकडुन सोन्याच्या दागिन्यासह १ कोटीचा मुद्देमाल लंपास

राजापूर तालुक्यातील मिठगावणे येथील पतसंस्था फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यासह १ कोटीचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.मिठगावणे येथे श्रमिक पतसंस्था आहे. या पंतसंस्थेत काम करणारे कर्मचारी मंगळवारी नेहमीप्रमाणे पतसंस्थेमध्ये गेले असता त्यांना पतसंस्थेचे शटर आणि दरवाजाची कडी कोयंडी उचकटलेली दिसून आली. त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता त्यांना पतसंस्थेतील सामान असताव्यस्त पडलेले दिसून आले. तसेच पतसंस्थेतील रोख रक्कम आणि ९० लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांनी नाटे पोलिसांना याची माहिती दिली. नाटे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button